शहरातील क्लब रोड वरील जिल्हा रुग्णालय आवारात आता ताजी फळे आणि पाले भाज्या मिळणार आहेत.राज्य सरकारच्या फळ बागायत खात्याच्या वतीनं नियोजित नूतन हाफकॉम्स केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
जिल्हा फळ बागायत खात्याचे संचालक आय के दोडमनी आणि सरकार नियुक्त संचालक सदस्य लकनना सवसुद्दी यांनी भूमिपूजन करून कामाला चालना दिली.
राज्य शासना कडून या भाजीपाला आणि फळ विक्री केंद्र सहा लाख रुपये खर्चातून उभे केले जाणार असून या दुकानात भाजीपाला फळांची विक्री केली जाणार आहे.
सिव्हिल इस्पितळात रुग्णांना आणि जनतेला सोय व्हावी म्हणून फळ भाजी पाला केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फळ बागायत खात्याचे संचालक आय के दोडमनी यांनी दिलीय.थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ताजी भाजी आणि फळांची विक्री या केंद्रात केली जाणार आहे.काडा कार्यालया समोर एक हाफकॉम्स केंद्र आहे त्या नंतर याच भागातलं हे दुसरं केंद्र असणार आहे.