पश्चिम घाटातील चोर्ला घाट परिसरात काही युवकांनी मान्सून जंगल ट्रेल चे आयोजन केले आहे. यात घनदाट अरण्यात ट्रेकिंग चा अनुभव घेता येणार असून फोटोग्राफी ची संधी देखील मिळणार आहे.या भागात जैव वैविध्यता खचाखच भरली आहे. येथे निसर्गाचे विविध अंग पाहता येणार आहेत. शनिवार दि ७ रोजी दुपारी तीन वाजता खानापूर रोड येथील मोरया पेंट्स येथे जमून सायंकाळी पाच पर्यंत कणकुंबी येथे जायचे आहे.
तेथे गेल्यावर थोडी माहिती दिली जाईल रात्री शाकाहारी आणि मांसाहारी जेवण दिले जाईल. रात्री १० ते ११.३० पर्यंत जंगल सफर होणार आहे.
रविवारी ८ रोजी सकाळी ७ वाजता न्याहारी करून नदी ओलांडणे, धबधबा चढणे आणि पुरातन मंदिरांना भेटी असा कार्यक्रम आहे. दुपारी दोन ला ट्रेक संपेल.
अधिक माहितीसाठी 9513029558, 6361084734 या क्रमांकावर संपर्क साधा.