मागील दोन वर्षांपूर्वीपासून खानापूर तालुक्यातील साखर कारखान्यांना ताकीद देऊन देखील ऊस बिले देण्यात येत नाहीत. जर लवकरात लवकर बिले देण्यात आली नाही तर आत्महत्या करू, असा इशारा खानापूर येथील शेतकरी संघटनेने दिला आहे.
प्रादेशिक आयुक्तांना हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्यातील सौभाग्य लक्ष्मी व इतर साखर कारखाने शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यास टाळाटाळ करत आहेत. यांबाबत वारंवार निवेदने व अर्ज सादर करण्यात आली आहेत. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे.
या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिले देणे बाकी असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या कारखान्यांनी अनेक शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बिले तातडीने द्यावीत अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीवेळी उसउत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलने केली होती. मात्र प्रश्न तसाच पडून आहे, बिले देण्याच्या बाबतीत हेळसांड सुरू आहे, ऊस घेताना स्पर्धा करणारे कारखानदार बिल देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. या प्रकाराला कंटाळून जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर महागात पडू शकते याची नोंद घेऊन प्रशासनाने वेळीच पावले उचलली पाहिजेत.
Trending Now