खासदार द्वयींकडून पुन्हा ‘विमानोडडाण मंत्र्याची’ भेट
बेळगाव विमान तळाचा आगामी ऑक्टोम्बर महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेज मधील उड्डाण योजनेत समाविष्ट करा अशी मागणी बेळगावच्या खासदार द्वयींनी केली आहे.
बुधवारी नवी दिल्लीत राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे आणि खासदार सुरेश अंगडी यांनी विमान उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे.
मे महिन्यापासून बंद असलेली विमान सेवेमुळे बेळगावातील उद्योजक जनतेला कसा त्रास सहन करावा लागत आहे याची जाणीव करून देत बंद पडलेली विमान सेवा पूर्व बहाल करण्यास पुढाकार घ्यावा अशी देखील मागणी केली आहे.
11 जुलै पासून बेळगाव बंगळुरू दरम्यान एअर इंडिया विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती देत बेळगाव मुंबई देखील विमान सेवा सुरू करा अशी मागणी केली.
एकेकाळी दररोज पाच ते सहा विमान येणाऱ्या उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठया विमान तळात आठवड्यातुन चार दिवस केवळ एकच विमान येणं म्हणजे बेळगावातील लोकप्रतिनिधिंचा नाकर्तेपणा म्हणावा लागेल असा आरोप केला जात आहे त्यामुळं कधी विमान सेवा पूर्व बहाल केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.