माउलींची पालखी जरी महाराष्ट्रात फिरत असली तरी त्याची खरी सुरुवात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी ;तालुक्यातील अंकली या गावातून होते.अंकली गावातील शितोळे सरकार यांना माउलींच्या पालखी चा आणि अश्वांचा मान आहे.गेल्या १८३ वर्षा पासून अंकली येथील शितोळे सरकार ही परंपरा चालवत आहेत.
माऊलींचे मानाचे अश्व आळंदीकडे रवाना झाले आहेत मंगळवारी सकाळी चिकोडी तालुक्यातील अंकली येथील इथे शितोळे सरकारच्या वाड्यातून पालखीची दिंडीने सुरुवात झाली.यावेळी श्रीमंत राजे उर्जित सिंह शितोळे सरकार त्यांचे चिरंजीव श्रीमंत राजे कुमार महंत शितोळे यांनी अश्वांची विधिवत पूजा केली.
“गेल्या ४०० वर्षा पूर्वी निझामाविरुद्धच्या लढाईत पेशव्यांना मदत केल्यानं अंकली(मांजरी) हा भू भाग इनाम,म्हणून शितोळे सरकारना मिळाला आहे आणि तेंव्हा पासूनच माउलींच्या पालखी शेजारील अश्वांचा मान देखील शितोळे सरकारांना मिळाला आहे आहे आळंदी पासून पंढरपूर कडे जाणाऱ्या सगळ्या दिंडीच्या समस्या,वाद विवादचे सगळे निर्णय शितोळे सरकारच्या तंबू ( झरीच्या फेट्या)खाली घेतले जातात”अशी माहिती श्रीमंत राजे उर्जित सिंह शितोळे यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.
अंकली गावातील मानाचे हे अश्व अंकली हून आळंदी कडेरवा ना झाल्या नंतर घोड्यांना मानपान सुरूच होते घोडे जसे जसे पुढे जातात तसं तसे शेतकरी भाविक भक्त घोड्यांचे दर्शन घेतात.ज्या भक्तांना आळंदी किंवा पंढरपूर ला जाउन विठोबाचे माउलीच दर्शन घेत येत नाही ते लोक या घेऊन स्वताला स्वताला धन्य समजतात.अंकली हून दररोज ३० कि मी अंतराने हे अश्व ३०० कि मी अंतर हे दहा दिवसात पार करून आळंदीला पोचतात.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील देन्ही मानाच्या आश्वांनी सोमवारी शुद्ध त्रयोदशीला श्रीमंत शितोळे सरकार,अंकलीकर यांच्या राजवाड्यातुन आळंदीकडे प्रस्थान केले त्यांना थाटात व माऊलीमय वातावरणा त निरोप देण्यात आला यावेळी गावभर भजन दिंडी काढण्यात आली.