बेळगाव वेंगुर्ला रोड अरगन तलावाजवळ धावत्या दुचाकी वर झाडं कोसळल्याने दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार दि 25 रोजी दुपारी घडली आहे.जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.या घटने नंतर बराच काळ ट्रॅफिक जॅम झाला होता.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अरगन तलाव विकसित कामात तलावाच्या बाजूनी कंपाऊंड बांधण्यात आले आहे पडलेलं झाडं कंपाऊंड ला लागून असल्याने झाडाच्या बाजूची माती पावसाने फिस्कटली होती त्यामुळं हे झाड पडलं असावं अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
झाड पडल्याने दुचाकीला नुकसान झालं आहे रहदारी पोलीस सहायक उपनिरिक्षक बसवराज सिंदगार यांनी घटनास्थळी भेट देऊन रहदारी वळवली.वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनेची पाहणी केली आहे.