रविवारचा दिवस बेळगाव शहरासाठी ब्लॅक संडे ठरला आहे कारण अपघाता तीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण बेळगाव शहरावरच शोककळा पसरली आहे.
रविवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान
शब्बीर मलिक या धारवाड येथील इसमाने दुसऱ्या रेल्वे गेटाजवळ रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची बातमी येते न येते देसुर क्रॉस जवळ खानापूर कडे जाणारे शहरातील तीन कॉलेज विद्यार्थी ठार झालेही दुखःद घटना घडलीआहे.
अथर्व जाधव वय 15 कोनवाळ गल्ली(जैन कॉलेज डीप्लोमा), हर्ष सावंगावकर वय 16 रा.मुजावर गल्ली(पियुसी प्रथम वर्ष जैन कॉलेज),अमन कपिलेश्वरी वय 17 रा. अनसुरकर गल्ली(जी एस एस सायन्स पी यु सी प्रथम) ही तिन्ही शहरातील मध्यवर्ती भागात राहणारी मुलं अपघातात मरण पावली आहे.यामुळे या तिन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जैन कॉलेज,गोगटे कॉमर्स आणि जी एस एस सायन्स कॉलेजमध्ये शिकणारे हे विद्यार्थी रविवारी सुट्टीच्या निमित्ताने खानापूरला जात होते देसुर क्रॉस प्रभू नगर जवळ अति वेगाने ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने समोरून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या इंडिका कारला जोराची धडक दिल्याने तिघांचाही घटना स्थळीच मृत्यू झाला होता.अपघात इतका भयानक होता की घटनास्थळा वर रक्ताच्या थारोळ्या पडल्या होत्या मृतदेह 20 फूट फेकले गेले होते.
अपघात होताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली मात्र मयत विद्यार्थ्यांची ओळख लवकर पटली नव्हती.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अपघातात ठार झालेल्या विध्यार्थ्यां बद्दल सर्वत्र चर्चा होती.सायंकाळी मृतदेहावर जिल्हा सिव्हील इस्पितळात शव विच्छेदना नंतर नातेवाईका कडे सोपवण्यात आले.
कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलां मुलींवर दुचाकी चालवणे याबाबत पालकांनी शिक्षकांनी समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे