बेळगाव शहराच्या महा पालिका कार्यक्षेत्रातील वडगाव अनगोळ भागातील सांडपाणी येळ्ळूरच्या बेळ्ळारी नाल्यात सोडू नये याची पर्यायी व्यवस्था पालिका प्रशासनाने करावी असा ठराव येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला.
शनिवारी दुपारी चांगळेश्वरी मंदिरात ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा अनुसया परीट होत्या. येळ्ळूर रोड वर शहरातील सांड पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून याचा त्रास ये जा करण्याना होत आहे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे पालिकेने याकडे लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी देखील या ठरावा द्वारे करण्यात आली आहे. ग्राम पंचायत सदस्य राजू पावले यांनी ठराव मांडला तर अमोल जाधव यांनी अनुमोदन दिल.
ग्राम सभेत नोडल अधिकारी श्रीकांत एम दानवी ,तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील,यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.कार्पोरेशन बँक मनेजर गैर हजर राहिले त्या बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी हेस्कॉम, कृषी शिक्षण खात्यासह विविध अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
“येळ्ळूरच्या ग्राम सभेने केलेला ठराव म्हणजे संपूर्ण गावाने केलेला ठराव आहे महा पालिकेच्या चुकीचा फटका येळ्ळूर रोड वरून ये जा करणाऱ्यांना बसत आहे”असा आरोप ग्राम पंचायत सदस्य राजू पावले यांनी केला आहे. ‘पालिकेचा असाच सावळा गोंधळ चालल्यास शहर कसे स्मार्ट होणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी जर का पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येळ्ळूर ग्रामस्थ पालिके समोर आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत’ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.