संतोष पाटील. बेळगावाचा नागरिक आणि सध्या युके च्या ब्रिस्टॉल देशात राहणारा युवक. दक्षिण इंग्लंड मध्ये १७ दिवसात १८०० किमी सायकलिंग करण्याचे मिशन त्याने पूर्ण केले आहे.
ही मोहीम २५ दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा हेतू होता पण दररोज १७६ किमी सायकल चालवून त्याने आठ दिवस आधीच यश मिळवले.
एक थ्रिलिंग अनुभव मिळाल्याचे त्याने सांगितले. शारीरिक, मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागले. भरपूर शिकायला मिळाले. निसर्ग, संस्कृती, वारसा स्थळे पहायला मिळाले. भरपूर चांगली माणसे भेटली.
काही रात्री कॅम्प साईट मध्ये घालवल्या, #couchsurfing community च्या मदतीने काहींच्या घरी राहता आले. ब्रिटिश पाहुणचार घेता आला, तो सांगत होता.
१८ महिन्याचा वंडर बॉय अडम ते ८० वर्षांचे मिस्टर लुईस सारख्या माणसांना भेटता आले. अनेकांनी मदत केली. काहीवेळा बिर्याणी, चिकन करी, जिरा राईस, रायता सारखे पदार्थ करून देत तर काहींचे इटालियन डिनर फस्त करीत हा प्रवास केल्याचे तो सांगतो.
या प्रवासात आदर मिळाला, लोक हातवारे करून प्रेरणा द्यायचे, एकदा चढ चढताना अनेकजण मागे थांबून राहिले. माझी दोनदा चूक झाली म्हणून त्यांनी हॉर्न वाजवून लक्षात आणून दिली. त्यांच्याकडे संयम आहे. ते घिसाडघाई करत नाहीत, ते अकारण हॉर्नही वाजवत नाहीत , वाहतुकीचे सगळे नियम शहरात आणि गावातही पाळतात, आनंद वाटला असे संतोष ला या प्रवासात जाणवले आहे.