Wednesday, December 25, 2024

/

एस आय टी चा तपास घनदाट अरण्यात

 belgaum

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट आणि त्याची तयारी बेळगाव येथेच झाल्याची माहिती मिळाल्यावरून बेळगावला दाखल झालेल्या एस आय टी च्या पथकाने बेळगावात तपास केला आहे. खानापूर तालुक्यातील घनदाट अरण्यात जाऊन तपास करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हा कट बेळगाव मध्येच शिजल्याचा अंदाज तपास पथकाला आला होता . यासाठी या हत्याप्रकरणातील आरोपी
परशुराम वाघमारे याला घेऊन एस आय टी चे पथक बेळगावला आले होते. बेळगाववर एस आय टी ची नजर दिवसभर घोंघावत राहिली. संपूर्ण शहर आणि परिसर एस आय टी च्या रडारवर होते.याच बरोबर अरण्य विभागातही नजर खिळवून राहिली होती.
गौरी लंकेश यांची हत्या आपणच केली आणि यासाठी बंदूक चालवण्यासाठी बेळगाव येथे प्रशिक्षण घेतले अशी कबुली अटकेतील आरोपी परशुराम याने दिली. यावरून एस आय टी च्या अधिकाऱ्यांनी त्याने खानापूरच्या अरण्यात जेथे बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले त्या भागाची जास्त पाहणी केली आहे.

बेेेळगाव परिसरात काही हिंदुत्ववादी संघटनांवर त्यांना संशय होता. याबद्दल तपास करण्यासाठी ते दाखल झाले होते संपूर्ण पणे अतिशय गुप्तपणे तपास झाला.

स्वतः हत्येची कबुली दिलेला परशराम ज्या संघटनेशी संबंधात आहे त्या संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या हालचाली, व्यवहार आणि इतर गोष्टी तसेच शस्त्रास्त्रे आणण्याचे मार्ग याचासुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारधारेतील व्यक्तींच्या एकामागोमाग हत्या झाल्या. यामध्ये कलबुर्गी व लंकेश हे कर्नाटकातील असल्याने कर्नाटक सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात एस आय टी स्थापन केली. या पथकाने सिंदगी येथून ११ जून रोजी परशराम वाघमारे याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याने दिलेल्या जबानीत आपण केलेली हत्या कबूल केली आहे. हत्येपूर्वी त्याचे वास्तव्य बेळगाव भागात होते असे त्याने सांगितल्याने पोलीस अधिक मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत.
बुधवारी दुपारी येऊन बेळगाव मध्येच राहून गुरुवारी तपास झाल्यानंतर हे पथक बंगळूर कडे रवाना झाले. या पथकाने याबद्दल कुठलीच माहिती मात्र माध्यमांसमोर उघड केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.