आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून शहरातील जवाहरलाल नेहरू कॉलेजच्या जलतरण तलावात जल योगाचे आयोजन करण्यात आले होते. जल योगाची चित्तथरारक आणि डोळ्यांना पारणे फेडणारी प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय जल योग तज्ञ अर्जुन मिरजकर आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी मिरजकर आणि मुलींनी जलतरण तलावात पाण्यात विविध प्रकारची जल योगाची प्रात्याक्षिके सादर केली. यावेळी अनेक लहान मुलांनी देखील पाण्यात योग कश्या पद्धतीने केली जातात याची प्रात्याक्षिके दाखवली.
बेळगाव जिल्हा पंचायत जिल्हा प्रशासन आयुष विभाग आणि के एल ई संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वीमर्स क्लब आणि अक्वेरीयस स्वीमर्स क्लब यांच देखील सहकार्य या कार्यक्रमास लाभले होते. अनोख्या पद्धतीने जल योगाची प्रात्याक्षिके पाहण्यासाठी योगा शौकीनांनी गर्दी केली होती