आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बेळगावच्या कलाकारांनी योगाभ्यासाचे महत्व पटवून देणाऱ्या गाण्याची निर्मिती केली आहे.चलो ,चले असे गाण्याचे बोल असून या गाण्याची निर्मिती अनिश सुतार याच्या स्वरानिश या संस्थेने केली आहे.
औरंगाबादचा प्रणव कुलकर्णी याची गीतरचना असून संगीत अनिश सुतार याने दिले आहे .
नुष्का आपटे, तन्वी इनामदार, अंतरा कुलकर्णी या बालकलाकारांनी या गाण्याला आपला गोड आवाज दिला आहे . उत्कृष्ट छायाचित्रण राजा कट्टी व ओमकार सुतार यांनी केले आहे . संयोजनाची जबाबदारी अजिंक्य कुडतुरकर यांनी स्वीकारली होती . योगाचे महत्त्व सोप्या सुटसुटीत शब्दात प्रणवने लिहिले आहे.
योग हा अत्यंत वेगळा पण महत्वाचा असा विषय गाण्यासाठी निवडला त्यामुळे याचे गाण्याचे वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे.बेळगावात बनलेलं हे गाणें पाहण्यासाठी तुम्हीखालील लिंक क्लिक करू शकता…