Monday, December 30, 2024

/

शहरात पुन्हा चैन स्नेचिंग …वृद्धाची आत्महत्त्या

 belgaum

गेल्या काही दिवसा पासून दुचाकीवरून पाठलाग करून महिलांच्या गळ्यातील चैन पळवण्याच्या घटनात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास टी व्ही सेंटर बुडा कॉम्पलेक्स जवळ दुचाकीस्वारा कडून एका कामगार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवल्याची घटना घडली आहे. ए पी एम सी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रेणुका पाटील या महिलेच्या गळ्यातील एक तोळे सोन्याची चैन पळवण्यात आली आहे सदर महिला मोलकरीण काम करत असून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पाठलाग करून तिच्या गळ्यातील चैन हिसकावून पलायन केल. ए पी एम सी पोलिसात घटना नोंद झाली असून दुचाकी वरून एकट्या युवकाने पाठलाग करून हे वरील महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले आहेत.

नैराश्येतून वृद्धाची आत्महत्त्या

ए पी एम सी पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील हनुमान नगर भागात नैराश्येतून एका वृद्धाने आत्महत्त्या केली आहे. मंगळवारी  रात्री ही घटना घडली होती. बिराप्पा वय ८२ रा. हनुमान नगर असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. सदर वृद्धास हृदय विकार जडला होता त्यातून त्यांनी नैराश्येतून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.