पावसाळा सुरू झाला की सारेच जण छत्री आणि रेनकोट खरेदी करताना दिसतात. मात्र यापुढे आता पावसाळी साहित्य खरेदीवरही जीएसटी भरावा लागणार आहे.
वस्तू व सेवाकर नव्या रचनेत पारदर्शक प्लास्टिक च्या रेनकोटवर १८ टक्के तर रेनसुटवर ५ टक्के कर भरावा लागणार आहे. दिडशेचा रेनकोट आता सव्वा दोनशेला घ्यावा लागणार आहे.
गतवर्षी १०० ते १५० रुपायाना मिळणारी छत्री आता २०० ते २५० रुपयापर्यंत पोहोचली आहे. रेनकोटचेही तसेच आहे.350 रुपयांना मिळणारा हलक्या प्रकारातील सूट यावर्षी ४०० ते ४५० पासून सुरू आहे. ६५० ते ७५० रुपयांचा सूट ८५० ते १२०० तसेच १५०० ( मध्यम प्रतीचे) रुपयांनी महागल्याचे सांगण्यात येत आहे.
वस्तू व सेवाकर केंद्र सरकारने लावल्यानंतर हा दर फरक आला आहे. रेनकोट हा प्लास्टिक वस्तूंच्या वर्गात मोडत असल्याने जीएसटी त याला अपवाद नाही. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आता आर्थिक भार सहन करावा लागत आहे.