बेळगाव विमान तळा वरून एकमेव उरलेली बेळगाव बंगळुरू ही स्पाईस जेट ची विमान सेवा1 जुलै पासून बंद होणार असल्याने उत्तर कर्नाटकात सर्वात लांब रनवे असलेल्या विमान तळाला कुलूप लावायची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना खासदार सुरेश अंगडी यांनी 12 जुलै पासून एअर इंडियाची बेळगाव बंगळुरू विमानसेवा सुरू होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
मंगळवारी खासदार अंगडी यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.एअर इंडिया च्या वतीनं 25 जून रोजी एक दिवस प्रायोगिक तर 12 जुलै पासून दररोज बेळगाव बंगळुरू दरम्यान ही विमान सेवा असणार आहे.
उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक विमान तळ म्हणून बेळगाव विमान तळाचा नाव लौकिक आहे सर्वात पहिला अत्यंत चांगली नाईट विमान लँडिंग सुविधा देखील याच विमान तळावर आहे मात्र इथले राजकारणी लॉबिंग करण्यात कमी पडल्याने गेल्या मे 5 पर्यन्त स्पाईस जेटची पाच विमान सेवा असलेल्या बेळगाव विमान तळाची गत केवळ एका विमानावर येऊन ठेपली आहे.
जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात अलायन्स एअर कडून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याची बातमी बेळगाव live ने चालवली होती त्यातच अंगडी यांनी एअर इंडिया कडून सेवा सुरू होणार असल्याचं सूतोवाच्य केल्याने live च्या बातमीला एक प्रकारे पुष्टीच मिळाली आहे.
काही का असेना केंद्र सरकारची सुरक्षे सह अत्यन्त महत्वाची कार्यालये बेळगावात असल्याने बेळगाव मुंबई-बेळगाव दिल्ली देखील थेट विमान सेवा सुरू व्हावी अशी मागणी केली जात आहे.