ग्रामीण भागातील बँक कर्मचारी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे बँक अधिकारी जणू काय आपल्या घरातील कर्ज देत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजे. असे सांगण्यात आले.
तालुका पंचायतीच्या सर्व साधारण सभेत सदस्यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलाच समाचार घेतला. यावेळी अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा ठरावही मांडण्यात आला.
नको ती कागदपत्रे आणायला सांगून वेळ मारुन नेण्यात बँक कर्मचारी धन्यता मानत आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी विवीध योजना लागू केल्या आहेत. मात्र एकाही बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना याचा लाभ करून देण्यात आला नाही. असा आरोप करण्यात आला. यापुढे असे न करता शेतकऱ्यांना याचा लाभ करून द्यावा असे आवाहन करण्यात आले.
बँकेत म्हणावा तसा मान दिला जात नाही म्हणून गावोगावी पतसंस्था स्थापन झाल्या आहेत. पण या पटसंस्थाही बँके सारखेच नियम लावून त्रास करत आहेत. शेतकऱ्यांना वेळेत कर्जे मिळून ते सावकारी कर्जात अडकू नव्हेत यासाठी बँका गरजेच्या आहेत. यासाठी बँकेत राहून स्वतःच्या घरून कर्ज दिल्याचा आव आणणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे ठरणार आहे.
Trending Now