मार्कंडेय नदीत मोठया प्रमाणात ड्रेनेजचे पाणी शिरत आहे. तर काही मोठया दवाखान्याचे रसायन मिश्रीत पाणीही नदीत सोडले जात असल्याने परीसरातील पिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
या पिकांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे का? याचा तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या ड्रेनेज पाण्यामुळे बेळगाव मार्कंडेय नदी परिसरात पिकणारा भाजीपाला खाल्याने कोणता रोग उद्भवतो का? याची काळजी घेण्यात यावी.
मार्कंडेय नदीचे पाणी पिण्यासाठी तर सोडाच पण शेतीलाही घातक ठरत आहे.
बेळगाव तालुक्याची जीवनदायीनी म्हणून मार्कंडेय नदीकडे पाहिले जाते. मात्र प्रदूषित झालेला या नदीचा प्रवास आता सुरू आहे तो मृत्यूदाइनिकडे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी पंचगंगा चे जसे सर्व्हे करण्यात आले आहे तसेच कर्नाटकातील शास्त्रज्ञानी मार्कंडेय नदीचा सर्वेक्षण करून अहवाल सादर केले पाहिजे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बेळगाव हे तीन राज्याना जोडणारे गाव आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र बेळगावचा भाजीपाला पाठविण्यात येतो. मात्र नदीकाठी असलेल्या भाजीपाला ड्रेनेजचे पाणी मिसळत असलेल्याने भाजीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीतील पाणी, माती आणि भाजी परिक्षणाची गरजेचे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
या नदीत सोडले जाणारे सांडपाणी थांबवून नदी प्रदूषण रोखण्याची मोठी गरज आहे.
Trending Now