यूपीएससी मधील स्पर्धा परीक्षा फार कठीण नसतात मात्र त्यासाठी तुम्ही ध्येयवादी आणि ठरवलेले काम पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे ,बेळगाव मधून स्पर्धा परीक्षा जाणाऱ्यांची संख्या कमी असली तरी भविष्यकाळात ती प्रचंड वाढेल असा मला विश्वास वाटतो ‘असे मत बेळगावचा सुपुत्र आणि 2017 ची स्पर्धा परीक्षा 563 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या निखिल निपाणीकर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले
येथील मराठा मंदिराच्या सभागृहात रविवारी सकाळी निखिल आणि 63 वा क्रमांक मिळवलेला पुण्याच्या पियुष साळुंखे या दोन तरुणांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ज्योती करियर अकॅडमी आणि द युनिक ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील हे होते तर पाहुणे म्हणून बेळगावचे यु पी एस सी उत्तीर्ण आकाश चौगुले हे होते.
विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीने खचाखच भरलेल्या मराठा मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाची सकाळी दहा वाजता सुरुवात झाली .भक्ती देसाई यांनी स्वागत केल्यानंतर युनिक अकादमी च्या बेळगाव शाखेचे प्रमुख राजकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले” बेळगाव भागातून अनेक आयपीएस व आईएएस निर्माण व्हावेत या उद्देशाने 2012 साली ज्योती करियर एकेडमी ची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुण्याच्या युनिक ॲकॅडमी च्या सहकार्याने 2016 साली बेळगावात मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली
प्रथम श्री राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सचिन बिचू, पियुष साळुंखे आणि निखिल निपाणीकर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर राजकुमार पाटील यांच्या हस्ते युनिक ॲकॅडमी चे पुण्याचे संचालक प्रवीण चव्हाण, आकाश चौगुले व राजाभाऊ पाटील यांना सन्मानित करण्यात आले
आपल्या तासभराच्या व्याख्यानात पियुष ने बेळगावचे आल्हाददायक वातावरण ,बेळगावची सौजन्यपूर्ण वागणूक याबद्दल आनंद व्यक्त केला “युपीएससी परीक्षेत गेल्यावर्षी पंधरा लाख विद्यार्थी बसले होते त्यापैकी साडेचार लाख विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेला संधी मिळाली त्यातून 13300 विद्यार्थी निवडून आले त्यापैकी केवळ 2700 जणांना मुलाखतीला बोलावण्यात आले आणि 990 जणांची अखेर निवड झाली त्यापैकी 180 जण आयएएस अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणार आहेत
ही माहिती देत असतानाच त्याने विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने परीक्षेची तयारी केली पाहिजे याचे मार्गदर्शन केले यु पी एस सी मध्ये जरी यश मिळाले नाही तरी आपले मिळवलेले ज्ञान कोठेही वाया जात नाही त्याचा आयुष्यात नेहमीच उपयोग होतो म्हणून ज्ञान मिळवणे थांबू नका. कायम आणि सातत्याने केलेला अभ्यास ,परिश्रम हेच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला