Tuesday, January 21, 2025

/

 पटसंख्या वाढवण्यासाठी असाही संघर्ष …

 belgaum

एकीकडे बेळगाव सह सीमा भागात मराठी जनतेवर कानडी वरवंटा फिरवत असताना मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी मराठी जनांस संघर्ष करावा लागत आहे.

MArathi student

मराठी शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांची गावभर ट्रॅकटर वरून मिरवणूक काढली जात आहे इतकंच नाही तर  पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांचा हार घालून आरतीनं ओवाळणी करून वाजत गाजत जल्लोषी स्वागत केलं जातं आहे.

Marathi school

बेळगाव तालुक्यातील निलजी या गावात मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी वेगळा उपक्रम म्हणून राबवला आहे.गेल्या काही वर्षांत बेळगावात मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे अनेक ठिकाणी मराठी पालक कन्नड आणि इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देत आहे अश्या स्थितीत मराठी शाळांची अवस्था दयनीय बनली आहे.

एकीकडे मराठी माणसाचे नेतृत्व करणाऱ्या समिती नेत्यांनी याकडे दूर्लक्ष केलं असताना युवा समितीच्या माध्यमातून मराठी शाळा वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि अश्यात स्थितीत निलजी सारख्या गावाने शाळेत मराठी पटसंख्या वाढवण्यासाठी आगळा आणि वेगळा असा प्रोत्साहन देणारा कार्यक्रम हाती घेतला आहे.

युवा समितीचे प्रमुख श्रीकांत कदम यांनी बेळगाव live ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मध्ये बसवून हार घालून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि शाळेत प्रवेश करतेवेळी ओवाळणी करून आत घेतले गेले, अशीच मानसिकता सर्व ठिकाणी असेल तर नक्कीच विद्यार्थी संख्या वाढीस मदत होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.