शिवापूर येथील अनेक शेतकरी वनविभागाची जमीन कसतात. मात्र काही दिवसांपासून वन विभागाने आपल्या जमिनी ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि वनविभाग यांच्यात संघर्ष वाढला असल्याचे दिसुन येत आहे.
बसप्पा हुद्दार या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे.
वनविभागाच्या त्रासाला कंटाळून शनिवारी एक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. हा शेतकरी वनविभागाची जमीन कसत होता. मागिल काही दिवसांपासून या भागात वनविभागाने आपल्या क्षेत्रातील जमीन ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाच्या जमिनीवर येथील अनेक शेतकरी विसंबून आहेत. बसप्पा हे कसत असलेली जमीन वनविभागाने ताब्यात घेतली होती त्यामुळे आपल्या कुटुबीयांचे कसे होणार याची काळजीत त्याने आपले जीवन संपविले.
त्यानंतर येथील शेतकरी भडकले. त्यांनी काकती पोलिसांना पहिला वनविभागातील अधिकाऱ्यांना बोलवा त्यानंतर पंचनामा करा असे आवाहन केले. या प्रकारा मुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.