पाऊले चालती पंढरीची वाट असे म्हणत आता चाहूल लागनार ती पंढरीच्या वारीची,,, आषाढी एकादशी दि २३ जुलै रोजी असली तरी बेळगाव हुन जाणाऱ्या भक्तांना दररोज रेल्वे नसल्याने प्रवास करणे त्रासाचे ठरत आहे.
बेळगाव परिसरातून पंढरपुरला वारी जाते, अनेकजण त्यात सहभागी होतात. आषाढी एकादशीचे महत्व अधिक आहे. त्यामुळे बेळगावातील भक्तही मोट्या प्रमाणात जातात. मात्र आठवड्यात एकदा किंवा दोनवेळाच पंढरपूर बेळगाव रेल्वे असल्याने येथील भक्त जन यांना त्रास होत आहे.
अजून एकादशी लांब असली तरी विठ्ठलाच्या भक्तांना आतापासूनच वारीचे वेध लागले आहेत. त्यामूळे पंढरपूर ते बेळगाव रेल्वे सुरु करण्याची मागणी होत आहे.