जर पालक हे पहिले शिक्षक असतील तर आज मुले पालकांकडून काय शिकत आहेत..?? जर उत्तम मूल्ये प्रेम आणि प्रशंसेने शिकविली तर त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन पूर्णतः बदलून जाईल.
व्यक्ती जी मूल्ये व तत्वे आचरणात आणते त्यांचा तिच्या कृतीवर आणि जगण्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याच्या प्रवृत्तीवर निर्धारित परिणाम होत असतो. ज्या कृती अत्यंत मौलिक असतात त्यांना “चांगल्या” म्हणून गणले जाते. ज्या कृती कमकुवत मूल्ये प्रकट करतात त्यांना वाईट म्हटले जाते.
तुमच्या मुलाने चांगली मूल्यव्यवस्था विकसित करावी असे जर तुम्हास वाटत असेल तर याबाबत पहिले शिक्षण पालकांकडून व्हावयास हवे तेही स्वतः शिस्त, स्वच्छता, काळजी घेणे, भावनांचा आदर करणे किंवा इतरात स्नेहभाव निर्माण करणे अशी मूल्ये पाळून त्यानंतर मुलांना ती स्वीकारण्यास उत्तेजन दिले पाहिजे. आजची पिढी पालक व समाजाचे निरीक्षण करण्याची प्रवृती जोपासताना दिसते. उक्ती व कृतीच्या बाबतीत वडिलधारांच्या पाऊलांवर पाऊल टाकणे ही त्यांच्याबाबतीत प्रौढ होण्यापर्यंतची प्रक्रिया आहे. म्हणून जर का आपण नकारात्मक मूल्ये जोपासत असू जी कमकुवत आहेत तर त्याचाही परिणाम मुलांवर होणारच जसे कि राग दर्शविणे, ओरडणे, व्देष, हिंसा, भ्रस्टाचार इ.
आजची मुले दूरदर्शन, सोशल मीडिया, आणि चित्रपट या माध्यमातूनही मूल्ये शिकत असतात. कल्पना करा किती गुन्हे, खून, मध्य जाहीराती त्यांनी शाळेच्या बाहेर येईपर्यंत पाहिल्या असतील. त्यामुळे आपली जबाबदारी ही बनते की, ह्या तंत्रज्ञानाचा वापर कितपत व्हावा यावर आपले नियंत्रण असले पाहिजे जेणे करून अधिक वेळ हा मुलांत उत्तम मूल्यांची जोपासना करण्यात खर्च होईल.
जर तुमचे मूल तुमचे ऐकत नाही असे तुम्हास वाटत असेल तर ध्यानात घ्या कि बराच काळ ते तुमचे निरक्षण करित होते. मुले मग ती लहान असावे कि मोठे ती निरक्षण करतच शिकतात, ऐकून नाही. आजच्या आधुनिक संस्कृतीची धुरा व मूल्ये आपण मुलांना देत आहात आणि एखादे दिवशी तुमच्या मुलांनी ती आत्मसात केलेली तुम्हाला दिसतील तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका कारण तुम्हाला हवे तसे जगणे हे ठीक आहे, हेच स्वातंत्र्य व अभिव्यक्ति ही आहे हे तुम्हीच त्यांना दाखविले आहे. पालक हे आजच्या संस्कृतीत अनुकरण करण्याजोगे खरे आदर्श आहेत. त्यानुसार जबाबदार पालक बनण्याचा प्रयत्न करा, तुमची मुले तुमच्यावर नजर ठेऊन आहेत.
आम्ही कायम आपल्या मुलांकडून चांगल्या मूल्यांची अपेक्षा ठेवतो, परंतु किती पालकांकडे चांगली मूल्ये आहेत आणि त्यांचे प्रतिपालन होते? त्यामुळे मुले हि तुम्ही काय करता तेच आचरणात आणतात. “मूल्ये” हि फार गंभीरतेने शिकवण्याची बाब आहे. पालकांनी गट बनवावेत आणि त्यातून आजच्या पिढीसाठी सामाजिक उत्तम मूल्यांची निर्मिती करावी. मूल्यांचा उभारणीसाठी सामाजिक एकवाक्यता ही आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक बाब आहे.
एक चांगला माणूस बनण्यासाठी अक्षरशः शून्य पैसे खर्च होतात !!!
“नैतिक मूल्यांवर आधारित योग्य पद्धतीचे शिक्षण हे समाज व देशास उच्च दर्जावर नेईल.” — डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम
मूल्ये, नाती, प्रेम, श्रद्धा, व स्नेह याना फार मोठा अर्थ आहे, ती तुम्ही आधी आत्मसात करवीत आणि त्यानंतर आपले जीवन जगण्यासाठी ती तुम्ही कशी अमलात आणता याचे उदाहरणासह शिक्षण मुलांना द्यावे.
प्रशंसा हि जादूच्या काडीप्रमाणे काम करते !! (एक मौल्यवान देणगी)
जर जगाने तुमच्या मुलांची प्रशंसा करावी असे तुम्हास वाटत असेल तर ती तुम्ही प्रथम करा. आपण दुसऱ्यांच्या मुलांची प्रशंसा करतो पण आपल्या मुलांच्या प्रशंसेचे महत्व आमच्या ध्यानीत येत नाही. यामुळे अंर्तमनावर परिणाम होतो आणि त्यामुळे वेगवेगळी फलनिष्पती होते.
प्रशंसा त्यांना काही अधिक करण्यास प्रोत्साहित करते. प्रशंसा त्यांना आपल्याप्रती अधिक प्रेम भावनेचे समाधान देते.
समझा तुम्ही कार्यालयात आहात, संपूर्ण महिनाभर कठोर मेहनत घेता आहेत आणि अशावेळी तुमच्या सहकार्याची पुरेशी प्रशंसा होते आणि तुमची मात्र होत नाही, तसेच तुम्ही जर गृहिणी असाल आणि स्वयंपाकाबाबत शेजारणीची प्रशंसा होते आणि तुमची मात्र कधीच होत नाही, हे तुम्हाला दुखावणारे असते… बरोबर ना ???
आम्ही वयानी वाढलेले असतो परंतु याच्या आपणास वेदना होतात. तर तुमच्या मुलांना दैनंदिन जीवनात त्यांच्या कृती बद्दल व भावनांबाबत असेच होत असेल तर ती कोणत्या वेदनातून जात असतील याची कल्पना करा.
आजच्या जगात जी प्रशंसा केली जाते ती चुकीच्या कारणांसाठी केली जाते, त्यामुळे पुन्हा मुलांची दिशाभूल होते. जेव्हा एखादी व्यक्ती नवी दुचाकी, कार, संपत्ती, किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करते तेव्हा त्या व्यक्तीची भरभरून प्रशंसा केली जाते. खरे तर अशा प्रशंसेचा मूलाधार कठोर परिश्रम आणि समर्पण हे गुण त्या व्यक्तीने हे शक्य होण्यासाठी दर्शविले हा असावयास हवा. असे करून तुम्ही तुमच्या मुलाचा दृष्टिकोन हा प्रयत्नसमर्पण, व शिक्षण प्रक्रिया जे त्यांना यश मिळवण्यासाठी आत्मसात करायचे आहे तिथे खात्रीपूर्वक जाईल व त्याकडे ती अधिक लक्ष देऊ लागतील.
“स्पर्धा ही सोपी गोष्ट आहे, पडद्यामागे कुठेतरी केलेले सारे काम आहे.” — उसैन बोल्ट
वरील वाक्य प्रशंसेचा नेमका रोख कशावर असावा याचे स्पष्ट चित्रण करणारे आहे.
आज आपण मुलांना इतरांचे जे यश दाखवितो ते भावना, नातेसंबंध यात भेद व व्देष निर्माण करणारे आहे. यातून त्यांचा दृष्टिकोन हा केवळ यश मिळवण्याकडेच जाईल. ती कठोर परिश्रमास उद्युक्त होणार नाहीत याउलट यशासाठी शॉर्टकट्सहि चालतील असे त्यांना वाटू लागेल. प्रत्येक मुलास कामगिरीत विजय मिळवण्यासाठी कुठे व कशी प्रयत्नांची गरज आहे हे शिकवण्यास हवे अन्यथा अंतिमतः वैफल्य व नैराश्य त्यांच्या वाट्यास येईल. निकाल किंवा निष्पती काय यावर भर ना देता, जे प्रयत्न तुमची मुले करू पाहतात त्यासाठी त्यांची प्रशंसा करा व उत्तेजन द्या.
जेव्हा मुलांचे संगोपन उत्तम मूल्यांच्या आधारे होत नाही व योग्यवेळी प्रशंसा होत नाही तेव्हा ती पालकांच्या हातून निसटतात किंवा वाईट जीवन जगू लागतात. तुमचे एक वाक्य “मी कामात आहे” त्यांचे जीवन नरक बनवू शकते आणि एक शब्द “प्रेम” त्यांच्या आयुष्यात आनंद आणू शकते. या धकाधकीचे जगात कुटुंबासाठी आम्ही काहीच देत नाही आहोत खरेतर देणे हाच आपला प्राधान्यक्रम असावयास हवा.
पालकांसाठी महत्वाचे मुद्दे:
- आपले नातेबंध आजचा जो अनुभव आहे त्याहून कितीतरी वेगळे होण्यासाठी आजच सवय आणि सुरुवात करा.
- आपल्या मुलातील निर्णय क्षमता वाढविण्यास मदत करा व प्रोत्साहन द्या.
- तुमचे मुल बरोबर काय करीत आहे यावर लक्ष केंद्रित करा, केवळ ते काय चुकीचे करते आहे यावर नको.
- गतकाळातील दुःखदायक आठवणी उगाळीत राहू नका.
- त्यांच्या मित्राबद्दल व स्नेह्याबद्दल चांगले बोला.
- त्यांचे वय समजून घ्या, तुम्हीही या वयातून गेले आहात. त्यावेळी तुम्ही काय केलेत याचे स्मरण करा !!
तुमचे मूल सायकल शिकत असते तेव्हा तुम्ही म्हणालेले असता, “पुढे जात राहा मी तुझ्या पाठीशी आहे.” निरंतर फुढे जाण्यास, आत्मविश्वास देणारे हे वाक्य आहे. हेच वाक्य तुम्ही यापूर्वी पुन्हा एकदा केव्हा म्हटले आहे काही आठवते?? तुमच्या मुलास कायम तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुमची एक साधी उत्तेजनपूर्व धक्का ती पुढे जाऊ लागतील याचा विचार करा.
मुलांना चांगले पालकत्व हवे हे ध्यानी घ्या आणि आत्ताच कृती करा!! तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर प्रेम करता आणि ती खरोखर अलौकिक बुद्धिमतेची आहेत असे त्यांना जरूर सांगा.
आर्टिकल सौजन्य – तेजस कोळेकर