सण आणि उत्सव काळात बेकायदेशीर रित्या गोमांस तस्करी होत असल्याचे निदर्शनास प्रथम येत असल्यास पोलिसांना माहिती ध्यावी बेळगाव पोलिसांनी यासाठी मोबाईल व्हाटस अप्प नंबर जारी केले आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिली आहे.
कुणीही कायदा हातात घेऊ नये कुठेही गोमांसाची बेकायदेशीर तस्करी होत असेल तर पोलिसांना माहिती ध्यावी जर का कुणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
कोणत्याही प्रकारचे अवैध मांस किंवा वाहतुकीची माहिती देण्यासाठी पोलीस खात्याने पोलीस खात्याने पोलीस आयुक्त ९४८०८००६५०पोलीस उपायुक्त ९४८०८००६५१ वर संपर्क करा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास माहिती पुरणाऱ्याला दिला जाणार नाहीअस देखील पत्रकात म्हटलं आहे.