बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे ७ बळी गेले आहेत. मागील वर्षी ही वळीवाच्या पावसात सात बळी गेले होते. यावर्षीही एप्रिल ते जून १२ पर्यंत सात जण दगावले आहेत.
यावर्षी अवकाळीआणि मान्सून पावसात ६०० हुन अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर १५ हुन अधिक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे यावर्षी पावसाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
या पावसामुळे शेतातही मोठे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर जमीनी मधील पिके वाया गेली आहेत. काही भागातील शेतकऱ्यांना हा पाऊस पोषक असला तरी अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
पाऊस पाहिजे पण तो नुकसान करणारा ठरू नव्हे पण निसर्गासमोर कुणाचे काय चालत नाही हेच खरे.
Trending Now