महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठयुवा समिती च्या वतीने बेळगाव शहर, ग्रामीण भागामध्ये सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याची बुधवारी सुरुवात करण्यात आली.
युवा समिती चा पहिला उपक्रम म्हणून बुधवारी शहापूर आळवण गल्ली मधील सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक १८ मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मराठी शाळा आणि भाषा संवर्धन, सिमाप्रश्न सोडवणुकीसोबत समाजकार्य करणे, राष्ट्रीय पक्षाच्या कार्याच्या तोडीस नवीन अजेंडे राबवून युवकांना समितीच्या प्रवाहात वापस आणणे, गाव, गल्ली, वॉर्ड, बुथनिहाय पातळीवर काम करणे आणि लोकांशी संपर्क साधने ह्या मूळ मुद्यांवर युवा समिती कार्य करणार आहे.
शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम बेळगाव शहर, ग्रामीण भाग, खानापूर, तसेच बिदर येथेही राबवण्यात येणार आहे.
या पहिल्या युवा समितीच्या सामाजिक उपक्रमाला युवा समितीचे कार्यकर्ते, शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी युवा समितीने शाळा नंबर19
आदर्श मराठी विद्या मंदिर
शाळा न. 13,शाळा नंबर16,शाळा नंबर 45,शाळा नंबर 8,शाळा नंबर 7,शाळा नंबर 3 मध्ये वितरण करण्यात आले.
सदर उपक्रमाला श्रीकांत काकतीकर, शुभम शेळके, संजीव कागळे, संजय मुतगेकर, सुरज कुडूचकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सचिन केळवेकर, किरण हुद्दार, अभिषेक काकतीकर, विनायक कावळे, सुरज चव्हाण, निर्मल धाडवे, राहुल हुलजी आणि इतर उपस्थित होते।