जिल्हाधिकारी आणि कोर्ट आवारात पोस्ट ऑफिस पाहिजेच त्यामुळे बंद असलेले पोस्ट ऑफिस पुन्हा स्थलांतरित करा अशी मागणी वकिलांनी केली आहे.बुधवारी वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत निवेदन सादर केलं.
कोर्ट आवारातील पोस्ट कार्यालयाचं खडक गल्लीत स्थलांतर करण्यात आले आहे या पूर्वी कोर्ट आवारात असलेल्या या पोस्ट कार्यालयाचा फायदा वकील सरकारी नोकर आणि जिल्ह्यासह शहरातील जनसामान्यांना होत होता मात्र कोणतेही कारण नसताना या पोस्ट ऑफिसचे स्थलांतर खडक गल्लीत करण्यात आले असल्याचे वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
अण्णासाहेब घोरपडे,वाय के दिवटे, रवी बोगार,उदय तलवार,गणपती जोशी,बी पी जेवणी,बी एस हिरेमठ आदी वकिलांनी सदर निवेदन दिले आहे.