कोणताही सण विना पोलीस बंदोबस्त साजरा करायला हवा यासाठी समाजातून प्रयत्न व्हायला हवे आगामी रमजान उत्सव शांततेत साजरा करा असे आवाहन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी केले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन राव, पोलीस उपायुक्त बी एस पाटील आदी होते.
राजप्पा पुढे म्हणाले की शिव जयंती गणेश उत्सवात सह इतर सणात मुस्लिम बांधवांनी सहकार्य दिल आहे तसेच सहकार्य आगामी रमजान सणात सर्व बेळगावकर जनतेने द्यायला हवं.
रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे बेळगाव शहराची शांततेत ईद साजरी करायची परंपरा असून ती जपायला हव त्याच पावित्र्य टिकवायला पाहिजे असे उपायुक्त सीमा लाटकर म्हणाल्या.पोलीस प्रशासन मुस्लिम बांधवांना सहकार्य करणार असून सोशल मीडिया वरील खोट्या अफवा वर विश्वास ठेवू नये असं देखील त्या म्हणाल्या.यावेळी विकास कलघटगी, रणजित चव्हाण पाटील सह मुस्लिम बांधवांनी आपले विचार मांडले.