मला मंत्री पदा पासून वंचित करून माझ्या विरुद्ध षडयंत्र केलेल्यांचा पत्ता लावणार या शिवाय सध्या ए आय सी सी राजीनामा देणार असं वक्तव्य काँग्रेस पक्षात बंडाचे हत्यार उपसलेले माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलं आहे.
सांबरा विमानतळा वर आगमन झाल्यावर त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याने पत्रकारांसमोर नाराजी व्यक्त केली. मी दुसऱ्याला मंत्री करणारा आहे माझंच नाव मंत्री पदाच्या लिस्ट मध्ये नसल्याने स्वाभिमानाला ठेच पोहोचली आहे असेही ते म्हणाले.
स्वपक्षातील कुतंत्रा मुळेच माझं मंत्रीपद हुकल हे स्पष्ट आहे राज्यात मुख्यमंत्री पदासाठी अनेकजण महत्वाकांक्षी आहेत मी सी एम च्या रेस मध्ये येईन म्हणून राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.