कोर्ट आणि दवाखान्याची पायरी शहाण्या माणसाने चढायची नाही अशी म्हण आहे. याचेच प्रत्यतर आता तिलारी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना होत आहे. येथील पोलिस चौकी बंद असली तरी काही पोलीस येथे थांबुन प्रवाशांना नाहक त्रास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तिलारी घाटाखाली असलेल्या वीज निर्मिती केंद्राच्या जवळ मागील वर्षभरापासून पोलीस चौकी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र गोव्याला जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. वाहनात मद्य नसले तरीही कागदपत्रे नाहीत कागद नाही असे म्हणून नाहक त्रास करत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत.
बेळगाव वरून काहीजण पेट्रोल स्वस्त आहे म्हणून घेऊन गेल्यास ते जप्त करून आपल्या वाहनात घालत असल्याचा प्रकार हे पोलीस करत आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.