इलेक्ट्रीक शॉक लागून सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावात घडली आहे. रवी बसप्पा येळ्ळूरकर वय 17 असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक कुली कामाला गेला असता त्याच्या हातातली लोखंडी सळीचा स्पर्श विद्युतभारित तारेला झाल्याने ही घटना घडली आहे.युवकाला जखमी अवस्थेत उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यासाठी नेले असता वाटेतच तो मयत झाला होता.हिरेबागेवाडी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.