ग्रामीण भागात सेवा बजावणाऱ्या डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कमलेशचंद्र आयोगाची अंमल बजावणी सह विविध मागण्या पूर्ण करा यासाठी मंगळवारी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा संघाच्या वतीनं बेळगावात आंदोलन करण्यात आले.
डाक विभागाच्या मुख्य कार्यालया पासून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत रॅली काढत आंदोलन केले केंद्र सरकारने नेमलेल्या कमलेशचंद्र आयोगाची त्वरित अंमलबजावणी करा असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पंतप्रधानाना निवेदन देण्यात आलं.
गेल्या 160 वर्षा पासून ग्रामीण भागात 80 टक्के लोकांच्या सेवेत कार्यरत एक लाख तीस हजार पोस्ट ऑफिस मधून दोन लाख 60 हजार पोस्टमन एकदम कमी पगारात सेवा बजावत आलेत.केंद्र सरकारने या पोस्टमन ना पगारवाढ करावी ही मागणी करण्यात आली आहे.
एस जी माऊतकर,रामा आनंदाचे,दुंडप्पा माविनकट्टी,अशोक सुतार,बी आर महाजन आदींनी या आंदोलनात सहभाग दर्शवला होता.