बेळगावात छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराजांच्या राणी चन्नमा यांच्या पुतळ्याची काळजी घेणारे पाहिले आहेत मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या भक्तांची संख्या कमी आहे अश्यात क्लब रोड वर बसवलेला महात्मा गांधींचा पुतळा मात्र सुशोभित नाही याची दखल घेत आपल्या परिवारासह हा पुतळा स्वच्छ केला आहे मराठी पत्रकार संघाचे सदस्य शेखर पाटील आणी कुटुंबियांनी..
बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर कॅटोंमेंट बोर्ड कडून महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे ही जागा छावणी सीमा परिषदेच्या व्याप्तीत येते या पुतळ्या भोवती ग्रील नाहीत विद्युत दीप देखील नाहीत रात्रीच्या वेळी पुतळा आहे की नाही हे सुद्धा दिसत नाही या पुतळ्या भोवती असलेले गवत काढून स्वच्छता करण्याचं काम शेखर पाटील यांच्या पत्नी मुलांनी मिळून केलं आहे.
या पुतळ्याच्या शेजारी गुटख्याची पाकिटं अनेक वस्तू टाकण्यात आल्या होत्या त्या पाटील यांनी स्वच्छ केल्या.सार्वजनिक बांधकाम खाते की कॅटोंमेंट बोर्ड या दोघांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केले आहे. मला गांधीजी बद्दल अभिमान आहे म्हणून मी माझ्या कुटुंबातील सदस्यांसह स्वच्छता मोहीम केली आहे असं शेखर पाटील यांच म्हणणं आहे.
56 इंचाच्या अच्छे दिनाच्या युगात अजूनही बेळगावात पत्रकारांच्या रूपात का असेना गांधीजीचें अनुयायी अजूनही आहेत असंच म्हणावे लागेल.