Monday, January 20, 2025

/

सर्वपक्षीय गोलमेज परिषदे साठी युवा समिती प्रयत्नशील

 belgaum

युवा समिती चा पहिला कार्यक्रम म्हणून कोल्हापूर ला मोटरसायकल रॅली काढून आगामी पावसाळी अधिवेशनात सीमा प्रश्नी आवाज उचलण्यासाठी  महाराष्ट्र मधील जेष्ठ नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांना निवदेन देणे  या सह *सीमाप्रश्नाबाबत मुंबई मध्ये गोलमेज परिषद भरविण्यात यावी जेणेकरून सिमाप्रश्नाचा चा आवाज सर्वदूर देशभरात पोहचेल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

YUva samiti

रविवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समितीच ची बैठक जत्तीमठ येथे संपन्न झाली बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली  जमलेल्या कार्यकर्त्यांनी विविध विषय मांडले.

मराठी शाळा आणि भाषा संवर्धन, सिमाप्रश्न सोडवणुकीसोबत समाजकार्य करणे, राष्ट्रीय पक्षाच्या कार्याच्या तोडीस नवीन अजेंडे राबवून युवकांना समितीच्या प्रवाहात वापस आणणे, गाव, गल्ली, वॉर्ड, बुथनिहाय पातळीवर काम करणे आणि लोकांशी संपर्क साधने, त्याचप्रमाणे
अश्या बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि युवा समितीची नवी कार्यकरणी, कार्यक्रम आणि दिशा ठरविण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

या बैठकीला मोठ्या संख्येने सर्वसमितिनिष्ठ कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.