ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ चालवलेल्या संगोळळी रायन्ना सोसायटीच्या मालकीच्या ४१ लाख रुपयांची वाहने खडे बाजार पोलिसांनी जप्त केली आहेत.
आनंद अप्पुगोळ हे सोसायटीच्या ठेवी दारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी देणे बाकी आहे संस्थेच्या ग्राहकांनी ठेवेलेल्या पैश्यातून अप्पुगोळ यांनी सदर वाहने खरेदी केली होती. पोलीस आयुक्त कार्यालयात सदर वाहने जप्त करून ठेवण्यात आली आहेत यात ३३ लाख किमतीची फोर्चुनर,इनोवा,क्वालीस, सात लाख ८५ हजार किंमतीची ३० दुचाकी वाहने ४१ लाखांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
गुरुवारी संगोळी रायन्ना संस्थेच्या थक बाकी दारांनी या संस्थेचे अध्यक्ष आनंद अप्पुगोळ यांच्या घर समोर जाऊन जोरदार आंदोलन केले होते.