आमचे पैसे द्या या मागणीसाठी संगोळी रायण्णा सोसायटीचा चेअरमन आनंद अप्पूगोळ याच्या घरासमोर ठेवीदारांनी रांका लावल्या आहेत. आज देतो, उद्या देतो असे सांगणे बस्स आता पैसे दे नाहीतर जाणार नाही असे लोक बोलत आहेत.
सहा महिन्यांपासून ही संस्था अडचणीत आली आहे. चेअरमन अप्पूगोळ याला कारागृहातही घातले होते, तो आता जामिनावर बाहेर असून लोक पैसे मागण्यांसाठी त्याच्या मागे लागले आहेत.