यमकनमर्डी विधान सभा मतदार संघाच्या व्याप्तीत बेकायदेशीर रित्या होत असलेली वाळू उपसा पूर्णपणे बंद करावी अशी मागणी करत आठ दिवसांचा अल्टीमेटम अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी पोलिसांना दिला आहे.
या बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात पोलिसांची आठ वाहने सामील आहेत जर वाळू माफियांनी के कृत्य बंद केले नाही तर स्वता यमकनमर्डी पोलीस स्थानका समोर आंदोलन छेढण्याचा इशारा दिला आहे.विधान सभा निवडणुकीच्या निकाला नंतर पहिल्यांदाच मतदार संघात जाऊन बुधवारी कार्यकर्त्यांची चिंतन बैठकघेतली त्या बैठकीत ते बोलत होते.वाळू माफियांना धडा शिकवण्याची गरज असून कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकात रीतसर अर्ज करा अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
मोदी आणि येडीयुराप्पा यांचा प्रभाव असलेल्या मतदार संघात विजयश्री खेचून आणल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.निवडणूक लढवत असलेल्या मतदार संघात एकदाही प्रचार न करता माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा तीन वेळा निवडून आले होते त्यांच्याशी बरोबरी का करू नये असा विचार मनात आला त्यामुळेच एकदाही मतदार संघात प्रचार केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी वाढवली याचा अभिमान आहे असे देखील ते म्हणाले.
पराभव हा कुणालाही चुकलेला नसतो इंदिरा गांधी सारख्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता यावेळी विजयाच अंतर कमी झाले मात्र जन्त्ने दिलेली ७३ हजार मते कमी नव्हती सलग तिसरा विजय हा आठवणीतला असे अस ही त्यांनी पुढे नमूद केल.