जिल्यातील विविध भागातू खडीमशीन च्या परवानगी बाबत अधिकाऱ्यांनी गंभीरता पाळावी , महत्वाचे म्हणजे ज्या मशीनना परवानगी दिली आहे त्यातील बऱ्याच जणांनी कागदपत्रच जमा केलेली नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला हे अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले आहेत,
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीवेळी त्यांनी अधिकारी वर्गाचा खरपूस समाचार त्यांनी घेतला, जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ११ जणांनी खडी मशीनसाठी अर्ज केले आहेत, तर ज्यांची मशीनि आहेत त्यांची कागदपत्रे नाहीत, त्यामुळे खाण आणि भूगर्भ खात्यातील बेजबाबदार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकल्याचेच दिसून येत आहे, सर्व कामे माझ्यावरच सोपवू नका, स्वतःही लक्ष ध्या, असे त्यांनी सांगितले,
सध्या जिल्यातील अनेक नद्यांमधून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे, तर काही ठिकाणी सरकारतर्फे वाळू उपसा करून ती देण्यात येत आहे, मात्र दर्जाहीन वाळू असल्याने ती खरेदी करण्यासाठी नागरिक पाठ दाखवत आहेत, याचा फटका सरकारला बसत आहे, ती वाळू जाईल त्या रकमेतून विका असा आदेशही जिल्ह्याधिकार्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे, यावेळी विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.