मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सत्तेत आल्यावर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांची कर्ज माफी करू असे निवडणूक प्रचारात आश्वासन दिले होते ते पाळले नसल्याचा आरोप करत विरोध पक्ष नेते बी एस येडीयुरप्पा यांनी सोमवारी 28 मे रोजी कर्नाटक राज्य बंद इशारा दिला होता. सोमवार चा बंद हा भाजप पक्षाचा नसून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शेतकरी कर्ज माफ न करण्या विरोधात असल्याने त्याला पाठिंबा दिला होता.
बंगळुरू येथील आर आर नगर विधान सभा मतदार संघात मतदान असल्याने या मतदार संघा व्यतिरिक्त राज्यभर सर्वत्र निदर्शन करण्यात येणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यन्त बंद पाळण्यात येणार आहे.भाजपने आयोजित केलेल्या बंद मध्ये सहभागी होऊन सर्व दुकाने बंद करून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी देखील सर्व दुकानदार व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.