रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, पाऊस पडल्यास पाण्यासाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडणार अशी शक्यता वर्तविली आहे. सध्या पोषक हवामानामुळे अंदमान च्या भागात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन हवामान खात्याने जाहीर केले आहे.त्याचा परिणाम रविवारी बेळगावमध्ये ही दिसून आला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे .त्यामुळे आता शेती कामाना वेग येणार आहे.
हवामान खात्याने २९ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असे सांगितले आहे. ढगाळ वातावरण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मुकेनू वादळामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर जाण्याची शक्यता होती. हे वादळ पुढे सरकल्याने मोसमी पावसाचा प्रवेश झाला आहे. सर्वच जण आता पेरणी कामाला लागणार अशी चिन्हे आहेत. यामुळे शेतकाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.