बेळगाव बटाटा आवक मंदावल्याने महागला आहे. सध्या प्रति क्विंटल दर १५०० ते २२०० पर्यंत जाऊन पोचला आहे. याच आकड्यांवर मागील दोन आठवड्यापासून बेळगाव कृषी बाजार समितीमध्ये बटाटा दर स्थिर आहेत.
शनिवारीही हे दर हलले नाहीत. सध्या बाजारात विक्रीसाठी जेमतेम प्रमाणात मागणीनुसार बटाटा येत आहे त्यामुळे काही प्रमाणात दरही स्थिरावले आहेत.
सध्या बेळगाव बाजारात इंदूरचा बटाटा देखील येत आहे.त्याची ही आवक कमी आहे.त्यामूळे इंदूरचा बटाट्याचा परिणाम बेळगावच्या दरांवर होताना दिसत नाही. सध्या इंदूरच्या बटाट्याचा दार १७००ते १९०० पर्यंत आहेत,तर बेळगावचा दर ३००रुपयांनी जास्त आहे.आणखी काही दिवस हा दर स्थिर राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.