आयरलंड देशात आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकाद्या निवडणुकीप्रमाणे गर्भपात विरोधी जनमत चाचणीचे एक्सिट पोल आणि आडाखे बांधले जात आहेत. सरते शेवटी ६६.४ टक्के लोकांनी एस फॉर उमन्स लाईफ असा कौल दिला आहे.
आयरिश टाइम्स या आयरलंड येथील सर्वात प्रभावी माध्यमाने गर्भपात विरोधी कायद्याला विरोध करावा का? या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी एस या पर्यायावर मतदान केले आहे असा दावा केला होता.तो दावा खरा ठरला.
सविता हालपन्नावर या भारतीय आणि विशेषतः बेळगावातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जगभरात आयरलंड देश आणि तेथील हा अन्यायकारक कायदा चर्चेत आला. त्यानंतर जनमत चाचणी घेऊन या कायद्याबद्दल ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी मोहीम सुरू झाली. से एस फॉर वुमन्स लाईव्हज हे मिशन सुरू झाले. यामुळे आयरिश सरकारला विशेष मतदान किंव्हा जनमत घेणे भाग पडले. आता निकाल महिलांच्या जीवनाच्या बाजूने लागणार हे नक्की झाले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.