राज्यात निधर्मी जनता दल आणि कॉंग्रेस सरकारने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या जिल्ह्यांत कुणाच्या कुणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार? पालक मंत्री पद कुणाला मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे असे असताना लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश जारकीहोळी दोघेही मंत्री पदासाठी दिल्लीत हाय कमांड कडे लॉबिंग करताहेत.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि यमकनमर्डीचे आमदार माजी मंत्री सतीश जारकीहोळी आणि राज्य महिला कॉंग्रेस अध्यक्षा आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या दोघांनीही मंत्री पदासाठी प्रयत्नशील आहेत या दोघात मंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. कॉंग्रेस जे डी एस सरकार बनवण्यात सिंहाचा वाटा घेतलेले मंत्री डी के शिवकुमार यांनी हेब्बाळकर यांना मंत्री बनवण्यासाठी दबाव आणला आहे तर दुसरीकडे ए आय सी सी चे अध्यक्ष राहुल गांधी आणि अखिल भारतीय महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांच्याकडे हेब्बाळकर यांची जवळीक आहे त्याचा देखील फायदा त्यांना मंत्री पद मिळवण्यात होत आहे.
या निवडणुकीत यमकनमर्डी या एस टी राखीव मतदार संघातून हटट्रिक साधून विजय संपादन केलेले सतीश जारकीहोळी हे ए आय सी सी सचिव देखील आहेत आपल्या मतदार संघात एकही जाहीर सभा न घेता अंटी इन्कमपन्सी ला डावलत ते निवडून येण्यात यशस्वी झाले आहेत.सिद्धरामय्या सरकारच्या कारकिर्दीत अबकारी आणि लाघुउध्योग मंत्री पदे त्यांनी भूषवली होती मात्र मंत्री मंडळ पुनर रचनेत त्यांना आपल मंत्री पद गमवाव लागल होत आता जे डी एस कॉंग्रेस संमिश्र सरकारमध्ये त्यांनी मंत्री पदासाठी दावा ठोकला आहे. सतीश जारकीहोळी कॉंग्रेस मध्ये येण्या अगोदर जनता दलात होते त्यामुळे गौडा परिवारा सोबत त्यांचे चांगले ट्युनिंग आहे.
राज्यात बंगळूरू नंतर बेळगाव जिल्ह्याला राजकारणात महत्व आहे तस बेळगाव हा १८ आमदार असलेला मोठा जिल्हा देखील आहे त्यामुळे एक मंत्री पद देतात का दोन यावर देखील कुणाला मंत्री पद मिळणार हे ठरणार आहे. सतीश की लक्ष्मी कुणाला मंत्री पद मिळणार हा सध्याच्या घडीतला चर्चेचा विषय बनला आहे.