Tuesday, December 24, 2024

/

एक्सिट पोल म्हणतात एस फॉर वुमन्स लाईव्हज

 belgaum

आयरलंड देशात आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकाद्या निवडणुकीप्रमाणे गर्भपात विरोधी जनमत चाचणीचे एक्सिट पोल आणि आडाखे बांधले जात आहेत.


आयरिश टाइम्स या आयरलंड येथील सर्वात प्रभावी माध्यमाने गर्भपात विरोधी कायद्याला विरोध करावा का? या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी एस या पर्यायावर मतदान केले आहे असा दावा केला आहे.
सविता हालपन्नावर या भारतीय आणि विशेषतः बेळगावातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जगभरात आयरलंड देश आणि तेथील हा अन्यायकारक कायदा चर्चेत आला. त्यानंतर जनमत चाचणी घेऊन या कायद्याबद्दल ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी मोहीम सुरू झाली. से एस फॉर वुमन्स लाईव्हज हे मिशन सुरू झाले. यामुळे आयरिश सरकारला विशेष मतदान किंव्हा जनमत घेणे भाग पडले. आता निकाल महिलांच्या जीवनाच्या बाजूने लागणार हे नक्की झाले आहे. असे आयरिश माध्यमे सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.