२५ मे हा दिवस आयरलंड देशाच्या इतिहासात महत्वाचा ठरणार आहे. आज या देशातील प्रत्येक व्यक्ती या देशाच्या गर्भपात विरोधी धोरणाला विरोध करून गर्भपात समर्थानात मतदान करणार आहे.
याला कारणीभूत असेल ती दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेली बेळगावची सविता हालपन्नावर.
या देशात रहात असताना नैसर्गिक प्रसुती होऊ न शकल्याने तिच्यावर गर्भपात करण्याची गरज होती. पण त्या देशातील कायद्यानुसार तिच्यावर गर्भपात करण्यासाठी विरोध झाला होता आणि यातच ती मृत्युमुखी पडली.
तेंव्हापासून आजवर या देशात बरेच विचारमंथन झाले. आणि हा अन्यायकारक कायदा बदलण्यासाठी पाऊल उचलण्यात येणार आहे.