बेळगाव शहर आता स्मार्ट होत आहे. इतके दिवस शहरात स्वच्छतागृहांची कमतरता भासत होती पण आता शहराच्या विविध भागात ७ ई टॉयलेट्स दाखल होत आहेत. त्यापैकी तीन तयार झाली असून बाकी चार ची तयारी सुरू आहे.
५ रुपये नाण्याच्या वापरातून या टॉयलेट्स चा लाभ घेता येईल. प्रत्येक टॉयलेट ची किंमत ७ लाख रुपये आहे. पाच रुपये टाकले तरच याचा दरवाजा उघडू शकतो. यामध्ये आरसा, खुर्ची व फॅन ची सोय असणार आहे.
हे स्वच्छतागृह पूर्णपणे अद्ययावत असेल तर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व इतर सोयी असणार आहेत.आतील भागात २२५ लिटर पाणी सामावून घेणारी टाकी असेल.
किल्ला तलाव, सिव्हिल हॉस्पिटल, आंबेडकर रॉड, धर्मवीर संभाजी चौक, शेरी गल्ली, टिळकवाडी पाहिले गेट,गोवावेस स्विमिंग पूल आणि श्रीनगर गार्डन या ठिकाणी ही टॉयलेट्स असणार आहेत.