राज्यात एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जे डी एस संभावित सरकार विरोध करत बेळगाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी कित्तुर चनम्मा चौकात काळी निशाण दाखवत विरोध केला.
बुधवारी सायंकाळी कुमारस्वामी हे मुख्यमंत्री तर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन जे डी एस काँग्रेसचे सरकार स्थापन करणार आहेत.
काळ्या फिती बांधून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस जे डी एस विरोधात घोषणाबाजी केली राज्यात निवडणुकीत बहुमत नसताना देखील वाम मार्गाने काँग्रेस सत्ता काबीज करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनात माजी आमदार संजय पाटील,जिल्हा भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी,राजू चिकन गौडर, श्रीनिवास बिसनकोप्प आदींनी सहभाग दर्शवला होता.