सध्या केरळ राज्यामध्ये ‘निपाह’ व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डबल्यूएचओ) च्या मते, निपाह व्हायरस हा वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांत पसरतो. 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपाहमध्ये अशा प्रकारच्या केसेस पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याला निपाह व्हायरस असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले होते. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळाला होता.
? _*लक्षणं काय आहेत?*_
▫ हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.
▫ हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात.
▫ लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.
▫ अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले.
▫ ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात.
▫ सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.
_*काय काळजी घ्याल?*_
▪ सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही.
▪ पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.
▪ संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा.
▪ वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.
▪ मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा. तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.