भक्ती महिला को ऑप सोसायटीला यावर्षी 51 लाख रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी दिली आहे.
नॉट बंदीचा काळ त्यातच जी एस टी आणि आयकर खात्याच्या जाचक अटी मुळे सर्वच क्षेत्रात मंदी आली आहे जनता आर्थिक संकटात सापडली आहे अश्या वेळी भक्ती महिला संस्थेने अनेकांना आधार दिला आहे.
रविवारी गुडस शेड रोड येथील भक्ती महिला संस्थेच्या कार्यालयात 20 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. यावेळी शेअर होल्डर ना शेअर रक्कमेच्या 10 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले.
संस्थेने महिलांना आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात देखील मदत केली असल्याचे देखील अगरवाल यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका रुपाली जनाज,वंदना चव्हाण,कल्पना देसाई,भक्ती देसाई, तेजस्विनी पाटील उपस्थित होते.संस्थेचे मॅनेजर अतुल कुलकर्णी यांनी मागील वर्षीचा वृत्तांत वाचून दाखवला. भक्ती देसाई यांनी सूत्रसंचालन केले