कर्नाटकात येडीयुराप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीएसच्या कुमारस्वामींना सत्ता बनविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. या नव्या मंत्रीमंडळात कॉंग्रेसच्या 20 तर जेडीएसच्या 14 मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
निकालानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून कॉंग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. जेडीएसने कॉंग्रेसला बरोबर घेत सत्तास्थापनेचा दावाही केला होता, मात्र राज्यपालांनी भाजपला संधी दिला. सर्वोच्च न्यायलयापर्यंत हा विषय गेल्यानंतर शनिवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार होते, मात्र येडीयुराप्पांनी तत्पुर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे कुमारस्वामींना सत्ता बनविण्याचे आमंत्रण मिळाले आहे. सोमवारी कुमारस्वामी आणि त्यांचे मंत्रीमंडळ शपथ घेईल.
सत्तावाटपात कॉंग्रेसला 20 तर जेडीएसला 14 मंत्रीपदे देण्याचे ठरले आहे. जेडीएसचा सहकारी पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. त्यांनाही मंत्रीपदाची अपेक्षा आहे.