सर्व पक्षांनी दिलेल्या उमेदवारातील एक ही उमेदवार मान्य नाही असे दाखवणारा नोटा हा पर्याय बेळगावमध्ये फक्त १ टक्के मतदारांनी निवडला आहे. एकूण मतसंख्येच्या १ टक्के जणांनी नोटा ला मत घातले आहे.
नोटा म्हणजेच वरील पैकी कोणी नाही (नन ऑफ दी अबोव) असे सांगणारी १४७४ मते बेळगाव दक्षिण मध्ये पडली आहेत. यामुळे नोटा मतसंख्येच्या पाचवा क्रमांक लागला आहे.
बेळगाव ग्रामीण मध्येही १९५८ मते नोटा ला पडली असून तेथेही पाचवाच क्रमांक आहे. नोटाची टक्केवारी येथे १.०५ इतकी आहे.
बेळगाव उत्तर मध्ये ०.९२ टक्के म्हणजे १३६१ जणांनी नोटाचे बटण दाबले आहे. तेथे नोटा चौथ्या क्रमांकावर आहे.
सर्वात कमी मते घेतलेल्यामध्ये उत्तर मतदारसंघातील महम्मद रसूल बेपारी यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांना फक्त ८८ मते पडली आहेत.
दक्षिण मधील अनिता शंकर दोडमनी या १३८ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
ग्रामीण मधील महम्मद रफिक मुल्ला यांनी २०४ मते मिळवली आहेत.